शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified गुरूवार, 9 जून 2022 (10:41 IST)

मुंबईत तीन मजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू, 16 जखमी

bandra west building collapsed
मुंबईत वांद्रे परिसरात तीन मजली इमारत कोसळली. बुधवारी रात्री 12.30 च्या सुमारास झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना वांद्रे येथील शास्त्रीगड भागातील आहे.
 
माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या, पोलीस, रुग्णवाहिका आणि महापालिकेचे पथक घटनास्थळी पोहोचले. मुंबई पोलिसांचे डीसीपी मंजुनाथ यांनी सांगितले की, शास्त्री नगर, वांद्रे येथे रात्री 12:15 वाजता जी + 2 इमारत कोसळली, ज्यामध्ये तळमजल्यावरील सर्व लोक सुरक्षित आहेत, पहिल्या मजल्यावर 6 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. दुसऱ्या मजल्यावर 17 जण होते ज्यात 16 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.
 
अपघातातील सर्व बळी हे बिहारमधील मजूर आहेत. ढिगाऱ्याखाली तीन ते चार जण अडकल्याची भीती बीएमसीने व्यक्त केली आहे. बचावकार्य सुरू असल्याचे बीएमसीने सांगितले.