1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (08:28 IST)

पेपर फुटीचे फेक ट्विट तरुणाला पडले महागात ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Paper footy fake tweets cost youth; Filed a case at the police stationपेपर फुटीचे फेक ट्विट तरुणाला पडले महागात ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल Maharashtra News Mumbai News In Marathi  Webdunia Marathi
मुंबई पोलीस भरतीचा पेपर फुटल्याबाबतची अफवा सोशल मिडीयावर पसरविणार्‍या तरूणावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नीलेश दिलीप पोटे (वय 26 रा. बारादरी ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, रविवारी मुंबई पोलीस भरतीचा पेपर झाला.
तत्पूर्वी पोटे याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट केले की, मुंबई पोलीस पदाची होणारी लेखी परीक्षा 14 नोव्हेंबरला राज्यात विविध केंद्रावर होणार आहे.

तरी अहमदनगर वरील काही केंद्रावर मुंबई पोलिसांचा पेपर फोडण्याच्या बातम्या येत आहेत. तरी यावर आपण तातडीने कारवाई करावी, अशी विनंती असे ट्विट केले होते.पोटे याने विद्यार्थांमध्ये भय पसरवून असंतोष किंवा भयग्रस्त वातावरण निर्माण केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संजय सुर्वे यांनी फिर्याद दिली आहे.
दाखल फिर्यादीनुसार नीलेश दिलीप पोटे (वय 26 रा. बारादरी ता. नगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.