गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : रविवार, 14 नोव्हेंबर 2021 (14:47 IST)

एसटी संप : 4 एसटी महिला कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचे विलीनीकरणाच्या मागणीला घेऊन एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या 8 दिवसापासून संप पुकारला आहे. एसटी कर्मचारी मुंबईच्या आझाद मैदानावर हे आंदोलन करत आहे. आज या संपाचा 8 वा दिवस असून एसटी च्या काही महिला कर्मचाऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्यांचे प्राण वाचवले. त्या मुळे मोठा अनर्थ टाळता आला.
 
परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे की अद्याप या मागण्यांवर कोणताही निर्णय झाला नाही. तसेच सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा निलंबनाची कारवाई देखील सुरूच असल्यामुळे कर्मचारी संतप्त झाले आहे. अशा परिस्थितीत मुंबईत संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सामील असलेल्या काही महिला कर्मचाऱ्यांनी आज स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. वेळीच तेथे असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखून मोठा अनर्थ होण्यापासून टाळला. संप करणाऱ्या या सर्व एसटी  कर्मचाऱ्यांसह अण्णा हजारे यांचा पाठिंब्या असल्याचे वृत्त आहे. भाजप नेते चित्रा वाघ यांनी देखील राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न कधी सोडवणार असे विचारले आहे.