शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 8 जानेवारी 2022 (21:34 IST)

ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रूग्णांमध्ये कोरोनाविरोधी लसीकरण झाले नाही : चहल

मुंबई कोरोनाच्या संसर्गामुळे उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णांमध्ये काही जणांना सध्या ऑक्सिजनची गरज भासत आहे. ही ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रूग्णांमध्ये ज्या व्यक्तींचे कोरोनाविरोधी लसीकरण झाले नाही, अशा रूग्णांचा समावेश असल्याची माहिती मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यामुळेच कोरोनाचा संसर्ग अधिक झाला नाही, असेही ते म्हणाले.
मुंबईत १९०० कोरोना रूग्ण हे ऑक्सिजन बेड्सवर आहेत. त्यापैकी ९६ टक्के रूग्णांचे कोरोनाविरोधी लसीकरण झालेले नाही. अवघ्या ४ टक्के रूग्णांनीच लस घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. खाजगी शाळांचे समन्वयक असलेले बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ भन्साली म्हणाले की, ऑक्सिजन बेडची गरज ही सध्या लसीकरण न झालेल्या रूग्णांना अधिक भासत असल्याचे त्यांनी सांगितले. हे रूग्ण ४० ते ५० वयोगटातील आहेत. त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीने लसीकरण पूर्ण गरजेचे असल्याचे ते म्हणाले.