शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (17:49 IST)

पोलीस महासंचालक संजय पांडे यांना हटवण्याबाबत जनहित याचिका दाखल

sanjay pwnday
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना हटवण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. संजय पांडे यांच्याकडे सध्या तात्पुरता चार्ज आहे. 
 
 यूपीएसीने तीन पात्र अधिकाऱ्यांची नावे पोलीस महासंचालक पदासाठी सुचवली आहेत. हेमंत नगराळे, के. वेंकटेशम आणि रजनीश सेठ यांच्या नावाची शिफारस केली आहे.  मात्र अद्यापही कायमस्वरुपी पोलीस महासंचालक नेमण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. 
 
अ‍ॅड. दत्ता माने यांनी ही जनहित याचिका केली आहे. संजय पांडे यांना पदावरून तात्काळ हटवून शिफारस केलेल्या अधिकाऱ्यांपैकी एकाची पूर्णवेळ नियुक्ती करावी, अशी मागणी याचिकेत  करण्यात आली आहे.