1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जून 2022 (21:51 IST)

मुंबई मधील रिक्षा-टॅक्सीच्या दरामध्ये होणार भाडेवाढ?

पेट्रोल-डीझेलसह अनेक वस्तूंच्या किंमती वाढल्याने देशभरात महागाई रोज नवा उच्चांक गाठत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. अशातच मुंबईमधील रिक्षा-टॅक्सीच्या दरामध्ये लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे.
 
गेल्या काही महिन्यांपासून सीएनजीच्या किंमतींमध्ये सातत्याने दरवाढ होत आहे. यामुळे सध्याच्या दरांमध्ये प्रवासी वाहतूक करणं रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परवडत नाही. म्हणूनच दरवाढीची मागणी सातत्याने रिक्षा-टॅक्सी चालक युनियनतर्फे करण्यात येत आहे. अशातच परिवहन मंत्री अनिल परब यांनी सुध्दा सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने सर्वसामन्यांच्या खिशावर आणखी ताण पडणार आहे.