शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 17 नोव्हेंबर 2022 (08:04 IST)

संजय राऊत म्हणाले खटला न चालवता थेट फाशी द्या

Shraddha Walker case
मुंबई : दिल्लीमधील श्रद्धा वालकर हत्येनंतर संपूर्ण देशामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या हत्येमध्ये आरोपी आफताबच्या निर्दयीपणाचीदेखील खूप चर्चा केली जात आहे. तपासामध्ये अनेक धक्कादायक खुलासे केले जात आहेत. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरोपीवर खटला न चालवता थेट फाशी द्या अशी मागणी केली आहे.
 
दिल्लीमध्ये २६ वर्षिय श्रध्दाच्या २८ वर्षिय बॉयफ्रेंड आफताबने केलेल्या निर्घूण हत्येने संपूर्ण देशाला हादरवले आहे. दिल्लीमधील श्रद्धाच्या खळबळजनक हत्येबाबत मंगळवारी (दि. 16) मुंबईत निदर्शने करण्यात आली. या निदर्शनाचे नेतृत्व भाजप नेते राम कदम यांनी केले होते. हे प्रकरण ‘लव्ह जिहाद’ असल्याचे त्यांचे म्हणने आहे.
 
दरम्यान, संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संजय राऊत माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, ‘वसई येथील श्रद्धाची दिल्लीमध्ये झालेली हत्या धक्कादायक आहे. कुटुंबीयांचा आक्रोश समजून घ्यावा. ही विकृती आहे. विकृतीच्या पुढची गोष्ट आहे. त्यामुळे आरोपीवर खटला न चालवता भरचौकात त्या नराधमाला फाशी द्या’. अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
नेमके काय आहे प्रकरण
 
आफताब अमीन पूनावाला असे या घटनेमधील आरोपी असणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने श्रद्धाचा गळा दाबून तिचा खून केला आणि त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृताच्या शरीराचे तुकडे ठेवून दिल्लीमधील वेगवेगळ्या भागामध्ये ते फेकून त्याची विल्हेवाट लावण्याचा कट त्याने रचला होता. हत्याकांड झाल्यानंतर 6 महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी आफताबला अटक केली आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor