मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 25 जून 2022 (14:49 IST)

मुंबईत 10 जुलैपर्यंत कलम 144 लागू

Section 144 implemented in Mumbai till July 10
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गदारोळात मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 10 जुलैपर्यंत त्याची संपूर्ण शहरात अंमलबजावणी करण्यात आली आहे. यासोबतच सोशल मीडियावरही या वेळी लक्ष ठेवण्यात येणार आहे.
 
10 जुलैपर्यंत मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. या दरम्यान शहरात कोणत्याही प्रकारची गर्दी करता येणार नाही. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड केलीय. 
 
शिवसैनिकांच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला असून सर्व पोलिस ठाण्यांना शहरातील सर्व राजकीय कार्यालयांमध्ये सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितलंय. सुरक्षेसाठी अधिकारी स्तरावरील पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रत्येक राजकीय कार्यालयाला भेट द्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.