मंगळवार, 5 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 2 मे 2023 (13:20 IST)

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार

sharad pawar
Maharashtra Breaking News राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे. तसेच यापुढे मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही असेही त्यांनी जाहीरपण सांगितले आहे.
 
मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात 'लोक माझे सांगाती' या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला जिथे शरद पवारांनी ही घोषणा केली. 
 
शरद पवार यांनी कार्यक्रमात ही घोषणा करताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला जोरदार विरोध केला आणि ते भावूक झाले. कार्यकर्त्यांनी शरद पवार आपला निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत सभागृह सोडणार नाही असा पवित्रा घेतला.
 
मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहे तर कुठं थांबायचं हे मला माहिती आहे असे ते म्हणाले. मी जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची लवकरच बैठक बोलवणार असल्याचेही ते म्हणाले.