बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 6 जुलै 2022 (15:21 IST)

आदित्य ठाकरे यांचे ट्विट... म्हणाले करून दाखवलं

aditya thackeray
यंदा हिंदमाता परिसरात पाणी साचणार नाही, असा दावा दरवर्षी केला जायचा. मात्र, दरवर्षी हा दावा फोल ठरत असे. मात्र, यंदा परिसरात पाणी साचलं नाही, त्यामुळे करून दाखवलं असं म्हणत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं आहे.
 
दरम्यान, हाच प्रयोग गांधी मार्केट परिसरातही करण्यात आला असून यशस्वी ठरला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी गांधी मार्केट येथील एक व्हिडिओ पोस्ट करत दशकभरात पहिल्यांदाच येथे विनाव्यत्यय रहदारी सुरू आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
 
गांधी मार्केट परिसरातील रहदारीचा व्हिडिओ मुंबई पालिकेच्या ट्विटर हॅण्डलवरून शेअर करण्यात आला आहे. या ट्विटचे रिट्विट करत आदित्य ठाकरे म्हणाले की, गांधी मार्केट आणि हिंदमातावर काम करू लागलो आहोत. कालच्या मुसळधार पावसाने हे दाखवून दिले आहे की गेल्या दशकभरात पहिल्यांदाच दोन्ही ठिकाणी विनाव्यत्यय रहदारी होती. आम्ही बनवलेल्या पंप आणि अंडरग्राउंड रेन होल्डिंग टाक्यांमुळे हे शक्य झालं आहे. तसेच, मिलन सबवे येथील टाकी पुढील वर्षी तयार होईल.