1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (12:31 IST)

धक्कादायक ! PUBG गेम खेंण्यासाठी आईच्या खात्यातून 10 लाख रुपये खर्च केले

कोणत्याही गोष्टीचे अति सेवन असणे कधीच चांगले नाही.कधी कधी या सवयी महागात पडतात.असच काही घडले आहे मुंबईच्या एका किशोरवयीन मुलासह.

मुलांसाठी मनोरंजनाचे साधन असण्याबरोबरच, PUBG गेम पालकांसाठी जणू एक समस्या बनत आहे.मुंबईत एका किशोराने PUBG गेम खेळण्यासाठी चक्क त्याच्या आईच्या खात्यातून10 लाख रुपये खर्च केले
 
एका किशोरवयीन (16) ला PUBG गेमचे इतके व्यसन लागले की त्याने गेम खेळताना त्याच्या आईच्या खात्यातून 10 लाख रुपये उडवून दिले.त्याच्या आईवडिलांनी त्याला याचा जाब विचारत खडसावले तेव्हा तो घर सोडून पळून गेला. 
मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना बुधवारी संध्याकाळी उघडकीस आली. बुधवारी संध्याकाळी किशोरच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असण्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयी वरून अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला.
 
तपासादरम्यान किशोरच्या वडिलांनी सांगितले की, त्यांचा मुलाला गेल्या महिन्यापासून PUBG गेमचे व्यसन लागले होते.तो दिवसभर मोबाईलवर हा गेम खेळत असायचा.या दरम्यान त्याने PUBG वर त्याच्या आईच्या बँक खात्यातून दहा लाख रुपये खर्च केले. हे कळल्यावर,जेव्हा त्यांनी त्याला रागावून जाब विचारला,तेव्हा तो घर सोडून निघून गेला.
 
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, घरातून पळून गेलेला किशोर गुरुवारी दुपारी अंधेरी (पूर्व) येथील महाकाली परिसरात सापडला.त्यानंतर त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आला.