रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (16:45 IST)

दुरुस्तीचे काम सुरु असताना कोसळला स्लॅब भांडुपमध्ये २ जणांचा मृत्यू

मुंबईच्या (Mumbai) भांडुप पश्चिम येथे एका घराच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना अचानक स्लॅब कोसळला. यामध्ये २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ही घटना खिंडीपाडा जवळील डंकन लाइन, क्रांती मित्र मंडळ परिसरामध्ये सकाळी साधारण ९.३० ते १० च्या आसपास घडली असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, खिंडीपाडा जवळील डंकन लाइन, क्रांती मित्र मंडळ परिसरात एका घराच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. अचानक या घराचा स्लॅब कामगारांवर कोसळला. यामध्ये १९ वर्षीय राजकुमार धोत्रे आणि १८ वर्षीय रामानंद यादव हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ही घटना नेमकी कशी घडली? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor