suvichar
✕

'म्हणून' मुंबईतील लसीकरण प्रक्रिया बंद

Updated: शनिवार, 15 मे 2021 (10:01 IST)
 
तौत्के वादळासह मुंबईती किनारपट्टींवर सोसाट्याचा वारा आणि पर्जन्यवृष्टी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे खबरदारी म्हणून मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईतील लसीकरण १५ आणि १६ मेला बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पालिकेच्या सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
मुंबई महानगरपालिकेने ट्विट करत मुंबईतील लसीकरण बंद राहणार असल्याचे सांगितले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. पर्जन्यवृष्टी आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे मुंबईतील झाडे उन्मळून पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरणामध्ये अडथळा आणि नागरिकांना कोणताही नाहक त्रास होऊ नये यासाठी महापालिकेने लसीकरण केंद्रच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुढील लसीकरणाविषयी योग्य वेळी माहिती देण्यात येणार असल्याचे महानगरपालिका आयुक्तांनी म्हटले आहे.
 
महानगरपालिका क्षेत्रातील समुद्र किनारा असलेल्या भागातील नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. तसेच सर्व कोविड सेंटर, रुग्णालयांजवळील उंच झाडांची छाटणी करण्यात आली आहे. वृक्ष उन्मळून पडल्याने अपघात होऊ नये यासाठी मुंबईतील अनेक वृक्षांची छाटणी करण्यात आली आहे. मुंबईतील ६ चौपाट्यांवर पूरबचाव पथके तैनात करण्यात आले आहेत. तसेच अग्निशमन दलाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबई पोलिसांनाही सतर्कतेचा इशारा देऊन मोबाईल व्हॅन सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर नागरिकांना जाण्यास बंदी घातली आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: कल्याण जिल्हा न्यायालयाच्या सुमारे १८० कर्मचाऱ्यांनी अनिश्चित काळासाठी संप सुरू केला

गायीला वाचवताना अपघातात प्रसिद्ध कवयित्री जागीच ठार

मुंब्रामध्ये मिठाई खाल्ल्यानंतर पाच जण आजारी पडले तर एकाचा दुर्दैवी मृत्यू ; FDA ने मिठाईचे दुकान बंद केले

मुंबई-भुसावळ रेल्वे मार्गाला गती मिळणार! कसारा आणि मनमाड दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग टाकण्यात येणार

सुधारित वेतनश्रेणीच्या मागणीसाठी कल्याण न्यायालयाचे १८० कर्मचारी अनिश्चित काळासाठी संपावर गेले

पुढील लेख
Show comments