गुरूवार, 11 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 11 सप्टेंबर 2022 (14:05 IST)

भीक मागण्यासाठी मुंबईतून लहान मुलांची चोरी,आरोपीला अटक

The accused woman along with the missing child were taken into custody from Dadar police station Maharashtra Mumbai News In Webdunia Marathi
बोरिवली जीआरपी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. दरम्यान, त्यांच्या अल्पवयीन मुलाला आणि मुलीला ताब्यात घेण्यात आले असून, ते रेल्वे स्थानकातून मुले चोरून भीक मागण्यास भाग पाडत होते. 8 सप्टेंबर रोजी एका महिलेने मुंबईतील बोरिवली जीआरपी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली की, तिचे तीन वर्षांचे मूल बोरिवली स्टेशनवरून बेपत्ता झाले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. अनेक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केल्यानंतर दादर स्टेशनवर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये आरोपी महिला बेपत्ता मुलासोबत दिसली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी महिलेला हरवलेल्या मुलासह दादर पोलिस ठाण्यातून ताब्यात घेतले.
 
सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना स्पष्टपणे दिसत आहे, त्यात एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झालेल्या मुलासोबत बोरिवली रेल्वे स्टेशनच्या पुलावर धावताना दिसत आहे. हे दृश्य लहान मुलाच्या चोरीचे आहे, ज्यामध्ये मुलगी चोरी करून पळून जाताना दिसत आहे. आरोपी महिला दिल्लीची रहिवासी असून तिला दोन मुले आहेत. 3 दिवसांपूर्वी ही महिला आपल्या दोन मुलांसह मुंबईत आली होती. यानंतर पोलिसांना माहिती देणाऱ्या महिलेशी तिची ओळख झाली आणि त्यानंतर संधी मिळताच महिलेच्या तीन वर्षांच्या मुलाला घेऊन पळून गेली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत आरोपी महिलेच्या दोन्ही मुलांनीही तिला साथ दिली. पोलिसांनी सुरक्षित तीन वर्षांच्या मुलाला त्याच्या आईच्या ताब्यात दिले. यानंतर आरोपी महिलेला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर न्यायालयाने आरोपी महिलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. त्यामुळे या कामात महिलेला साथ देणाऱ्या तिच्या मुलाला आणि मुलीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.