गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (22:41 IST)

मुंबई-सिंधुदुर्ग विमान सेवेला तूफान प्रतीसाद

मुंबई-सिंधुदुर्ग विमान सेवेला अद्याप सुरुवात झालेली नाही. दरम्यान, चिपी विमानतळाचे उद्घाटन 9 ऑक्टोबरला होणार आहे. त्यादिवसापासूनच विमान सेवा सुरु होणार आहे. मात्र, या विमान सेवेला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. विमानाचे कालपासून बुकिंग सुरु झाले आणि तासाभरात 20 ऑक्टोबर 2021पर्यंतचे आरक्षण फुल्ल झाले आहे.
 
मुंबई-सिंधुदुर्ग विमान सेवेला तुफान प्रतिसाद पाहता ही सेवा अधिक गतिमान होण्याची शक्यता आहे. मुंबई - सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग - मुंबई अशी विमाना सेवा एअर इंडियाकडून सुरु होणार आहे. या विमान सेवेची ऑनलाईन तिकीट विक्री सुरु करण्यात आली आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग आणि परतीचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहे. अवघ्या तासाभरात 20 ऑक्टोबरपर्यंतची तिकिटे संपली.
 
सिंधुदुर्गच्या विमानसेवेला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. एअर इंडियाने तिकीट विक्रीला सुरुवात केली, पण अवघ्या तासाभरातच 20 ऑक्टोबरपर्यंतचे आरक्षण फुल्ल झाल्याची माहिती एअर इंडियाच्या संकेतस्थळावर दिसत आहे.  
 
एअर इंडियाच्या ‘अलायन्स एअर’ या उपकंपनीमार्फत मुंबई ते सिंधुदुर्ग मार्गावर विमान उडणार आहे. मुंबई ते सिंधुदुर्गसाठी 2520 रुपये तर सिंधुदुर्ग ते मुंबई परतीच्या प्रवासासाठी 2621 रुपये तिकीट दर आहे. दररोज सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी मुंबईहून निघालेले विमान दुपारी 1 वाजता चिपी येथे उतरेल. तर परतीचा प्रवास दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी सुरू होईल आणि विमान 2 वाजून 50 मिनिटांनी मुंबईत पोहोचेल.