सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (10:55 IST)

कल्याण हादरलं : 8 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

बलात्कारांचं सत्र सुरुच, डोंबिवलीची घटना ताजी असताना कल्याणमध्ये आठ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटनाने कल्याणला पुन्हा हादरवून टाकले आहे.

शिकवणी घेणारा एका शिक्षकाने आठ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला गेला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

कल्याणच्या एका सोसायटीत राहणारी ही चिमुकली याच परिसरात शिकवणी चालवणाऱ्या एका शिक्षकाकडे शिकवणीला जायची.या आरोपीची पत्नी या चिमुकलीला शिकवणी देत होती.काही दिवसांपूर्वी ती माहेरी गेल्यावर सदर आरोपी शिकवणी द्यायचा.घरात कोणी नसल्याची संधी साधून या नराधमाने या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला.नंतर ही चिमुकली शिकवणीला जाण्यास तयार होत नसे.तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असताना तिला हा धक्कादायक प्रकार कळला.तिने ताबडतोब या घटनेची पोलिसात तक्रार करून गुन्हा नोंदविला.पोलिसांनी घटनेचे गांभीर्य बघून आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा तपास घेत आहे.