बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : सोमवार, 20 मे 2024 (11:55 IST)

मुंबईमधील फ्लॅटमध्ये वृद्ध दांपत्याची आत्महत्या, दुर्गंधी आल्यामुळे पोलिसांनी तोडले दार

suicide
देशाची आर्थिक राजधानी मुंबई मध्ये एक घटना घडली आहे. एक फ्लॅट मध्ये एक 61 वर्षीय व्यक्ती फाशीच्या फंद्यात लटकत होते तर त्यांची 57 वर्षीय पत्नी मृत अवस्थेत पडली होती. फ्लॅटमधून दुर्गंध आल्यामुळे शेजारच्यांनी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश केला तर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. 
 
मुंबईमध्ये एका घरामध्ये 2 मृतदेह मिळाल्याची माहिती समोर आली आहे. फ्लॅटमध्ये 61 वर्षीय व्यक्ती फाशीच्या फंद्यात लटकत होता तर त्याची 57 वर्षीय पत्नी मृत अवस्थेत पडली होती. फ्लॅटमधून दुर्गंध येत असल्याची माहिती शेजारच्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी दरवाजा तोडल्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. 
 
हे पूर्ण प्रकरण कांदिवलीमधील आर्य चाणक्य नगर मध्ये असलेली अनुभूती सोसायटी मध्ये घडले आहे. शेजारच्यांनी दिलेल्या सूचनेमुळे पोलिसांनी वेळेवर येऊन पाहिले पण दरवाजा मधून लॉक होता. खूप प्रयत्नांनी पोलिसांना दरवाजा तोडण्यात यश आले. आयात मध्ये शिरताच दुर्गंध वाढला. एका खोलीमध्ये या वृद्ध दांपत्याचे मृतदेह मिळालेत. पोलिसांनी अधिकारींनी दिलेल्या माहितीनुसार हे 61 वर्षीय व्यक्ती नायलनच्या दोरीला लटकत होते. तर 57 वर्षीय त्यांची पत्नी जवळच मृत अवस्थेत पडली होती. 
 
पोलीस अधिकारींनी सांगितले की, दोघांचे मृतदेह सडले होते. या दांपत्यांना आपत्य नाही. सध्यातरी चौकशी सुरु आहे ही हत्या आहे की आत्महत्या. या दांपत्याचे मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी पाठवले.