बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (11:29 IST)

SMUGGLING ची पद्धत जाणून व्हाल थक्क, मुंबई विमानतळावर 2 किलो सोनं जप्त

मुंबई विमानतळावर स्मगलिंगसाठी आणलेलं तब्बल 2 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. मुंबई कस्टम्सच्या एअर इंटेलिजेंस युनिट (AIU) ने आज अबु धाबीहून मुंबईत उतरलेल्या इथियाड एअरवेजच्या विमानातून सुमारे 2 किलो सोने जप्त केले आहे. जप्त केलेल्या सोन्याची एकूण किंमत सुमारे ९० लाख रुपये आहे. 
 
हे सोनं विमानाच्या सीटखाली ओल्या धुळीच्या रूपात ठेवण्यात आलं होतं. सोने विमानाच्या सीटखाली सुरक्षा जॅकेटच्या जागी लपविल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबईतील कस्टम विभागाला या मोडस ऑपरेंडीची कल्पना आल्यानंतर त्यांनी सोनं जप्त केलं. याप्रकरणी एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.
 
प्रवाशाची तपासणी करण्यात आली तेव्हा त्याच्या जीन्स पॅंटमध्ये लपवून ठेवलेले सोने सापडले. पँटच्या दोन थरांमध्ये सोने चिकटवले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सफाई कर्मचाऱ्यांसाठी सीटखाली सोन्याची पावडर गोळा करून विमानातून बाहेर काढली होती. 
 
AIU या प्रकरणाशी संबंधित काही विमानतळ कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करत आहे.