नवी मुंबईत भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू  
					
										
                                       
                  
                  				  महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई येथे शुक्रवारी पहाटे कार आणि डंपर यांच्यात झालेल्या अपघातात एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झालेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे लोक पुण्याहून मुंबईला जात होते. तसेच वाशी खाडी पुलावर पहाटे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. 
				  													
						
																							
									  
	 
	मिळालेल्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी कारमध्ये तीन जण प्रवास करत होते तसेच डंपर आणि कार यांच्या या धडकेनंतर दोन पुरुष आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी रुग्णालयात पाठवले. 
				  				  
	 
	अधिकारींनी सांगितले की, अपघाताचे कारण तपासले जात असून या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात अली आहे.  
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  Edited By- Dhanashri Naik