शनिवार, 12 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 28 मे 2023 (15:19 IST)

Thane : 24 व्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

death
Thane : ठाण्यातील पाचपाखाडी येथील आनंद सावली बिल्डिंग मध्ये 24 व्या मजल्यावरून पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या वेळेस घडली आहे. मयत तरुण आपल्या नातेवाइकांकडे आलेला होता. तरुणाच्या नावाबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. तरुणाचा तोल गेल्यामुळे तो पडलेला असावा अशी शक्यात वर्तवली जात आहे. 

नातेवाईकांकडे गेलेला तरुण 24 व्या मजल्यावरून पडून खाली पडून त्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली आहे.तरुणाचा तोल गेल्यामुळे तो खाली पडला असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले आहे. तरुणाच्या पडल्यावर बघणाऱ्यानी गर्दी केली होती. पोलीस अपघाताचा शोध लावत आहे. 
हा घातपात आहे की अपघात पोलीस याचा शोध लावत आहे. तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
Edited by - Priya Dixit