शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024 (18:46 IST)

ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

ठाण्यातील एक तरुण गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याच्या मृतदेह रस्त्याच्या कडेला झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला असून लोकांनी सदर माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास सुरु केला. 
 
नवी मुंबईतील पारसिक हिल परिसरात एका 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह झाडल्या लटकलेल्या अवस्थेत आढळला असून हा तरुण दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीचा आढावा घेत मृतदेह ताब्यात घेतले आहे.  
 
पोलिसांनी तपास केला असता मृतक आदेश दारवगाव येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. रविवारी रात्रीपासून तो बेपत्ता होता.  सोमवारी रात्री दीड वाजता आदेश पारसिक हिलकडे जाताना अखेरचा दिसला होता, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे तो बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी सीबीडी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. 

पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. तरुणाने आत्महत्या केली आहे की त्यामागे आणखी काही कारण आहे, याचा शोध घेण्याचा अधिकारी प्रयत्न करत आहेत. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत  आहे. 
Edited By - Priya Dixit