मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 22 डिसेंबर 2022 (20:57 IST)

किशोरी पेडणेकर यांना सर्वात मोठा झटका, वरळीतील घर-कार्यालय सील

kishori pednekar
ठाकरे गटाच्या नेत्यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीय. ठाकरे गटाला वारंवार धक्क्यावर धक्के मिळताना दिसत आहेत. आतादेखील मुंबईतून एक मोठी बातमी समोर आलीय. मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुंबई महापालिकेकडून मोठी कारवाई करण्यात आलीय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किशोरी पेडणेकर यांचं वरळीच्या गोमाता नगरमधील कार्यालय आणि घर सील करण्यात आलं आहे. किशोरी पेडणेकरांसाठी हा खूप मोठा झटका मानला जातोय.
मुंबई महापालिकेने किशोरी पेडणेकर यांचे एसआरए कायद्यानुसार कार्यलय आणि घर सील करुन एसआरए विभागाकडे सुपूर्द केल्या आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरए योजनेवरुन गंभीर आरोप केले होते.
किशोरी पेडणेकर यांनी एसआरए योजनेतील सदनिका बळकावल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता मुंबई महापालिकेने किशोरी पेडणेकर यांचे वरळीतील संबंधित वादग्रस्त सदनिका सील केल्या आहेत.ॉ
 
किरीट सोमय्या यांनी नेमका काय आरोप केला होता?
किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पेडणेकर यांनी एसआरएर योजनेतील 6 गाळे हडप केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. विशेष म्हणजे या प्रकरणी आपण दोन वर्षांपूर्वी तक्रार केली होती, असा दावा सोमय्या यांनी केला होता.
Edited by : Ratnadeep Ranshoor