बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 26 मार्च 2022 (09:58 IST)

भरधाव ट्रक ने कुटुंबाला चिरडलं, मायलेकी गंभीर जखमी

मुंबई -दहिसर मार्गावर एका भीषण अपघातात भरधाव ट्रकने एका कुटुंबाला चिरडल्याची घटना घडली आहे. हे कुटुंब पंजाबचे रहिवासी असून मुंबईला परतताना काळाने झडप घालून मुंबई -दहिसर मार्गावर भरधाव येणाऱ्या ट्रक ने संपूर्ण कुटुंबाला चिरडलं असून कुटुंबातील मुलाचा आणि त्याच्या बहिणीचा जागीच मृत्यू झाला. तर आई आणि मोठी मुलगी हे गंभीररित्या जखमी झाले आहे. 
 
 गुप्ता कुटुंब हे मूळचे पंजाबचे असून मुंबईला परत येत होते त्यांच्या वाहनाला ट्रक ने धडक दिली आणि त्या कुटुंबातील एकुलता की मुलगा आणि त्यांच्या बहिणीचा जागीच मृत्यू झाला .आई आणि मोठी मुलगी गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. अपघाताची माहिती मिळतातच  घटनास्थळी आजुबाजूच्या लोकांनी जमावडा केला. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.