रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (17:12 IST)

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या चांगलीच नियंत्रणात

राज्यात दुसऱ्या लाटेचा धोका ओसरत असताना तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर या दोन्ही लाटांचा यशस्वी सामना करणाऱ्या मुंबईमध्ये कोरोनाची स्थिती सर्वोत्तम आहे.
 
मुंबईमध्ये मार्च 2020 कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर मे 2020 मध्ये चाचण्यांच्या प्रमाणात पॉझिटिव्हिटी रेट 27.69 इतका सर्वाधिक होता. पुढे फेबुवारी 2021 च्या मध्यावर आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्हिटी रेट 16.14 टक्क्यांवर गेला होता. मात्र सद्यस्थितीत मुंबईत चाचण्यांच्या प्रमाणात बाधितांचं प्रमाण एक टक्क्यापर्यंत खाली आलंय, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिलीये.
 
कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्यानंतर सुरुवातीच्या काळात कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण जास्त होते. 20 हजार चाचण्यांमध्ये सुमारे 28 टक्के बाधित आढळत होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांच्या संख्येने 11 हजारांचा टप्पा गाठत एका दिवसात सर्वाधिक बाधितांची नोंद केली. तर आता सद्यस्थितीत रुग्णसंख्या चांगलीच नियंत्रणात आली आहे.
 
मुंबईत फेब्रुवारी 2021 च्या मध्यावर आलेल्या दुसऱ्या लाटेत सरासरी पॉझिटिव्हिटी रेट 3.25 इतका होता. मात्र रुग्णवाढ कायम राहिल्याने एप्रिलमध्ये सर्वाधिक म्हणजेच 16.14 टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट नोंदवला गेला. ऑगस्ट महिन्यात 26 ते 37 हजार चाचण्या दररोज होत आहेत. चाचण्यांचे सरासरी प्रमाण 32500 इतके आहे. दुसऱ्या लाटेत आता पॉझिटिव्हिटी रेट 16.14 टक्क्यांवरून एक टक्क्यावर आला आहे.