बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 20 फेब्रुवारी 2022 (16:18 IST)

ऑर्केस्ट्रामध्ये पैशांचा पाऊस, नोटा गोळा करण्यासाठी लोकांची गर्दी, व्हिडीओ व्हायरल

विरार मध्ये एका धार्मिक कार्यक्रमात पैशांचा पाऊस पडला आहे. आणि ते पैशे उचलण्यासाठी गर्दी जमा झाल्याचे वृत्त मिळाले आहे. विरार मध्ये स्वयं चैतन्य शक्तिधाम गोशाळा कडून विरारच्या रायपदा येथे गुजराती समाजाच्या या धार्मिक  कार्यक्रमाचं शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमाला प्रख्यात राजस्थान मधील प्रख्यात गायिका कच्छ कोकिळा गीताबेन रबारी, संतवाणी आराधक गोविंद भाऊ गाढवी, लोक साहित्यकार प्रतापदान गाढवी यांच्या गाण्याच्या धार्मिक कार्यक्रमात प्रख्यात गुजराती गायिकेच्या गाण्यावर ताल धरत गायिकेवर काही जणांनी पैशांची बरसात करत नोटांचे बंडल उधळले.या कार्यक्रमाला विरार आणि आसपासच्या गुजराती समाजाच्या लोकांनी उपस्थितीत लावली होती. 
 
या कार्यक्रमात नोटांच्या बंडलाची उधळणी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे नोट उचलण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.  
हा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्य करत आहे.