1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (13:59 IST)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यक्रमात स्टेज कोसळला

The stage collapsed during MNS president Raj Thackeray's program मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यक्रमात स्टेज कोसळला Marathi Mumbai News IN Webdunia Marathi
ठाण्यात गोरेगावात येथे मनसेच्या शाखा उदघाटनाच्या कार्यक्रमातमाणसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित असताना स्टेज कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने राज ठाकरे यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर या ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. स्टेजच्या क्षमतेपेक्षा अधिक कार्यकर्ते असल्यामुळे हा स्टेज कोसळून पडला. 
 
गोरेगावात मनसेच्या शाखेचे उदघाटन समारंभात उभारण्यात आलेल्या स्टेजवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. स्टेजच्या क्षमतेपेक्षा जास्त लोक जमल्यामुळे स्टेज खाली कोसळला. त्यात राज ठाकरे हे खाली पडले. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. ते सुखरूप असून पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले आहे.