सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (15:42 IST)

दाऊद इब्राहिमच्या भावाला ईडीकडून अटक

File Photo
डी कंपनीवर ईडीने मोठी कारवाई केली आहे, या प्रकरणामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ईडीने अटक केली आहे. खरं तर, काही काळापूर्वी ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने ठाणे न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेण्याची मागणी केली होती. दाऊद आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यांच्या तपासासाठी असे करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. ही याचिका आता ठाणे न्यायालयाने मान्य केली आहे.
 
आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे कारागृहातून ताब्यात घेण्यात आले आहे. आता कासकरला मुंबईतील पीएमएलए कोर्टात हजर केले जाईल, ज्यामध्ये ईडीचे अधिकारी त्याच्या कोठडीची मागणी करणार आहेत.