शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 20 फेब्रुवारी 2022 (15:21 IST)

मुंबई लोकल ट्रेनबाबत महत्त्वाची बातमी,हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

Important news about Mumbai local train
मुंबई लोकल ट्रेन ने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईत हार्बर मार्गावर मध्य रेल्वेने हा मेगाब्लॉक ठेवला आहे.पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलने प्रवास करणाऱ्यांनाही कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. मात्र रविवार असल्याने रुळांवरून धावणाऱ्या लोकल फेऱ्यांची संख्या कमी असेल.
 
रेल्वे ट्रॅक, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड वायर्सच्या दुरुस्ती व देखभालीसाठी दर रविवारी मेगाब्लॉक ठेवण्यात येतो. मेगाब्लॉकमुळे लोकल उशिराने धावत असून त्यांच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत.
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुना भट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉकच्या कामामुळे चुनाभट्टी/वांद्रे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप रोडवरील लोकल सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वडाळा रोडवरून वाशी/बेलापूर/पनवेलपर्यंतची डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 11.16  ते दुपारी 4.47  पर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे/गोरेगावपर्यंत सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 पर्यंत बंद राहणार आहे.
 
पनवेल/बेलापूर/वाशीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत बंद राहील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत बंद राहील.
 
या मेगाब्लॉकदरम्यान कुर्ल्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक आठ ते पनवेलपर्यंत विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. याशिवाय मेगाब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हार्बर मार्गावर मेगाब्लॉक लावण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल मध्य रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली आहे.