मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (08:20 IST)

वीजेचा धक्का लागून मुंबई महापालिकेच्या दोघा कर्मचाऱ्याचा मृत्यू

मुंबईतील कुर्ला परिसरात सुमननगरजवळ पाण्याच्या पाईपलाईनच काम सरु  होते. यावेळी वीजेचा धक्का लागून महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर ५ कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी कर्मचाऱ्यांना तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
मुंबईतील कुर्ला परिसरातील सुमननगरजवळ मेट्रोचे काम सुरू आहे. याचदरम्यान  पाण्याची पाईपलाईन फुटल्याने दुरुस्तीच काम सुरु होते. यावेळी अचानक 7 कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का बसला. यात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर पाच जण हे यातून थोडक्यात बचावले. महेश जाधव (40), राकेश जाधव(39),  नरेश अधांगळे(40), नाना पुकळे (41), अनिल चव्हाण (43) अशी जखमींची नावं असून त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अमोल काळे (40) आणि गणेश दत्तू (वय 45) यांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.