बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 1 ऑक्टोबर 2020 (08:22 IST)

आता बलरामपूरमध्ये हाथरससारखी घटना, दलित युवतीवर सामूहिक बलात्कार, मरण्याआधी आईला म्हणाली, 'खूप वेदना होत आहे, आता मी जगणार नाही'

यूपीच्या हाथरस येथे दलित मुलीवर जे घडले त्याचा धक्क्यातून अजूनही लोक सावरू शकले नाही, तर त्याच राज्यात बलरामपूरमधील आणखी 22 वर्षांच्या दलित मुलीशी सामूहिक बलात्काराच्या बातमीने सर्वांना हादरवून सोडले. आहे. यानंतर संपूर्ण परिसर छावणीत रूपांतरित झाला आहे.
 
दोन्ही आरोपी मुलांनी मैत्रीच्या बहाण्याने दलित मुलीला बोलावून सामूहिक बलात्कार केला. ही लज्जास्पद घटना घडवून आणल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
 
मृत मुलीच्या आईने आरोप केला आहे की, मुलीला इंजेक्शन लावून तिच्यावर बलात्कार करून तिची कंबर आणि दोन्ही पाय तोडले गेले आणि रिक्शात बसून घरी पाठवले गेले, त्यानंतर तिला काहीच बोलता आले नाही. ती फक्त इतकेच म्हणू शकली, 'खूप वेदना होत आहे, मी आता वाचणार नाही.' मात्र बलरामपूरचे एसपी देव रंजन वर्मा यांनी असे म्हटले आहे की हात, पाय आणि कंबर मोडणारी गोष्ट योग्य नाही. शवविच्छेदन अहवालात याची पुष्टी झालेली नाही.