डोंबिवलीत 13व्या मजल्यावरून पडून दोन वर्षांच्या चिमुकलीचा जीव वाचला, व्हिडिओ व्हायरल
'देव तारी त्याला कोण मारी' हे डोंबिवलीतील देवीचापाडा परिसरात एक चमत्कारिक घटना पाहायला मिळाली. या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.या घटनेचा एक व्हिडिओ 26 जानेवारीला समोर आला आहे.
रविवारी सकाळी 13 व्या मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून दोन वर्षाची चिमुकली खाली पडू लागली.
इमारतीत राहणाऱ्या भावेश म्हात्रे नावाच्या तरुणाने स्वता:चे जीव धोक्यात घालून या चिमुकलीचा जीव वाचवला. चिमुकली 13 व्या मजल्यावर खेळत असताना रेलिंगवरून घसरून बालकनीच्या काठावर लटकली नंतर ती खाली पडली. 13 व्या मजल्यावरून मुलगी खाली पडताना पाहून भावेश ने धावत जाऊन तिला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र चिमुकली त्याच्या हातून निसटली आणि थेट जमिनीवर जाऊन पडली. या अपघातात मुलीला किरकोळ दुखापत झाली.
सदर घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एवढ्या उंचीवरून पडून देखील मुलीला किरकोळ दुखापत झाली हा सर्व देवाचा चमत्कार असावा.
स्थानिकांनी भावेशचे खुप कौतुक केले आहे.भावेश ने माणुसकीचा आदर्श दाखवला आहे.त्याने हात दिला नसता तर चिमुकली वाचली नसती अशी चर्चा सर्वत्र होत आहे. सध्या ती चिमुकली सुखरूप असून तिच्यावर किरकोळ उपचार सुरु आहे.
Edited By - Priya Dixit