'उद्धव ठाकरे खासगी रुग्णालयात उपचार घेतात, म्हणजे सरकारी रुग्णालय चांगले नाहीत'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मानदुखीच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
पण याच मुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे हे खासगी रुग्णालयात दाखल होतात, याचा अर्थ सरकारी रुग्णालयं चांगली नाहीत, हे तुम्ही मान्य करता
देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली तेव्हा त्यांनी सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात उपचार घेतले होते.
यावेळी केंद्र सरकारने उत्पादन शुल्क करूनही राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी केल्या नाहीत, या मुद्यावरूनही पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.