बुधवार, 8 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified सोमवार, 3 मे 2021 (16:34 IST)

मुंबईत लसींच्या तुटवड्यामुळे 45 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण बंद

पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्याने मुंबई महापालिका क्षेत्रातील शासकीय, महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवर आज 45 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद राहणार आहे. मात्र 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पालिकेने ठरवून दिलेल्या 5 केंद्रांवर सुरू राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. ज्यांची कोविन ऍपमध्ये नोंदणी झालेली आहे आणि ज्यांना निर्धारित लसीकरण केंद्र आणि वेळ दिलेला आहे, त्यांनाच लसीकरण केंद्रावर लस मिळणार आहे.
 
महत्त्वाचे म्हणजे पालिका प्रशासन लस उपलब्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असून लसीचा साठा प्राप्त होताच नागरिकांना कळविण्यात येणार आहे. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तोपर्यंत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर आणि लसीकरण केंद्रावर येऊन गर्दी न करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
 
दरम्यान, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे महापालिकेने जाहीर केलेल्या 5 केंद्रावर लसीकरण सुरु राहणार आहे. आज सकाळी 9 ते 9 या नियमित वेळेत लसीकरण सुरू राहणार असून या 5 केंद्रावर प्रत्येकी 500 नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. हे लसीकरण केवळ ‘कोविन ॲप’ मध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठी असणार आहे.