सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 16 सप्टेंबर 2024 (11:54 IST)

भिवंडीमध्ये 16 वर्षीय मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडापाव विक्रेत्यावर गुन्हा दाखल

suicide
ठाणे मधील भिवंडी मध्ये 16 वर्षीय एका मुलाने फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. तसेच त्याला आत्महत्या करण्यासाठी भरीस पाडले म्हणून एका व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारपोली पोलीस स्टेशनच्या अधिकारींनी सांगितले की, आरोपीची ओळख वडा पाव विक्रेता कुणाल चौधरी म्हणून झाली आहे.
 
वरिष्ठ अधिकारी भरत कामथ यांनी सांगितले की, 11 सप्टेंबरला मयत गौरव झा हा वडा पाव खरेदी करण्यासाठी दुकानात गेला. तेव्हा आरोपी चौधरी ने या मुलाला आपल्या घरी काही सामान देऊन ये असे सांगितले, पण मुलाने नकार दिला, रागात असलेल्या चौधरी ने त्याला कानशिलात लगावली. यामुळे दुखी झालेल्या गौरवाने राहत्याघरी फाशी घेतली.
 
अधिकारींनी सांगितले की, गौरवच्या वडिलांनी चौधरी विरुद्ध यावर आपल्या मुलाला आत्मह्त्या करण्यासाठी प्रवृत्त केले म्हणून तक्रार दाखल केली आहे.  

Edited By- Dhanashri Naik