सोमवार, 1 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 9 जानेवारी 2022 (13:12 IST)

ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित रामदास कामत यांचे निधन

Veteran singer-actor Pandit Ramdas Kamat passes away Marathi Mumbai  News In Webdunia Marathi
ज्येष्ठ  गायक अभिनेते रामदास कामत यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षाचे होते. त्यांची ओळख उत्तम गायक आणि संगीत नाटकांच्या सुवर्ण युगाचे साक्षीदार असलेले पंडित रामदास यांनी रात्री अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा डॉ .कौस्तुभ कामत, सून डॉ. संध्या कामत ,नातू अनिकेत आणि नातसून भव्या असा परिवार आहे. त्यांच्यावर अंधेरीपूर्व च्या पारसी वाडा स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार होणार आहे. 
पंडित रामदास हे मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकांच्या सुवर्ण युगाचे साक्षीदार मानले जात असे. हे मूळचे गोव्याचे होते. त्यांनी पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित भीमसेनजोशी , प्रभाकर पेंढारकर, भालजी म्हणजे भालचंद्र पेंढारकर आणि पंडित गोविंद बुवा अग्नी यांच्या कडून नाट्य संगीत आणि अभिनयाचे धडे घेतले होते. तसेच त्यांनी आपल्या वडील बंधू उपेंद्र यांच्याकडून संगीताचे धडे देखील घेतले होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.