शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 10 जून 2021 (16:03 IST)

मुंबईत हाय टाइडसंदर्भात इशारा

मुंबईत पहिल्याच पावसातच मुंबईची दाणादाण उडाली. आता मुसळधार पाऊस पडल्यानंतर रस्ते, रेल्वे रुळ पाण्याखाली गेलेत आणि लोकल सेवा ठप्प झाली. दरम्यान, मुंबईत हाय टाइडसंदर्भात इशारा देण्यात आला आहे.
 
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार आज दुपारी 12.17 वाजता मोठ्या भरतीची शक्यता आहे आणि यावेळी समुद्रामध्ये 4.26 मीटरच्या लाटा येतील. इशारा देताना हवामान खात्याने सांगितले की, मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जोरात भरतीच्या वेळीही जर पाऊस पडला तर मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागू शकतो.