मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 9 जून 2021 (18:15 IST)

मुंबईत हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे मुंबई आणि उपनगर भागात आज सकाळ पासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून मुबंईत दरवर्षी प्रमाणे यंदाही पाणी तुंबत आहे.गेल्या 2-3 तासापासून सतत पाऊस सुरु असल्याने कामाला जाणाऱ्या लोंकाना अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यांची या तुंबलेल्या पाण्यातून निघायला दमछाक होत आहे.

सायन,हिंदमाता,किंग्सर्कल या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून त्यातून वाहन काढणे अवघड होत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.
हवामान खात्याने मुंबई आणि कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देत सतर्क राहण्याचे सांगितले आहे.तसेच या पुढील 4 दिवस हे धोक्याचे असून समुद्राला भरती होण्याचे संकेत ही त्यांनी दिले आहे. 
 
मुंबईत समुद्राला भरती येऊन अजून मुंबईत अजून पाणी भरण्याची शक्यता आहे.मुंबई आणि कोकण भागात जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शविली आहे.त्यामुळे कामाशिवाय कोणीही बाहेर पडू नये असे सांगण्यात आले आहे.