शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (11:33 IST)

काय सांगता,चक्क पैशाचा पाऊस ? रस्त्यावर लाखांचा नोटा व्हिडीओ व्हायरल

मुंबईजवळ वसई परिसरात एका चौकात चक्क 2000 रुपयांचा नोटा आढळल्या आहे त्यामुळे लाखो रुपयांचा नोटा बघून नागरिकांची गर्दी उसळली आहे. त्यात लहान मुलं आणि तरुणांचा समावेश आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे सर्वत्र या घटने बाबत जोरानं चर्चा सुरु आहे. ही घटना वसईच्या मधुबन परिसरातील आहे. या ठिकाणी 2000 रुपयांचा बनावटी नोटांचा पाऊस झाला. आधीतर नागरिकांनी एवढा नोटा बघून जमा करण्यास सुरु केले नंतर त्यांना कळले की या बनावटी नोटा आहे तेव्हा त्यांनी तिथून जाणेच योग्य समजले.हा नोटांचा पाऊस एका वेबसिरीज साठी करण्यात आला होता. भर रस्त्यावर एवढा नोटा पाहून नागरिक गोंधळले नंतर त्यांनी त्या नोटा जमवायला सुरु केले. पण नंतर नोटा बनावटी असल्याचे समजले.