गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 5 जून 2021 (16:04 IST)

वाचा, मुंबईची लोकल सेवा कधी सुरु होणार

राज्यात सोमवारपासून अनलॉक होत असताना मुंबईची लोकल सेवा  कधी सुरु होणार, याची उत्सुकता सर्वसामान्यांना आहे. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण देताना राज्य सरकार आणि केद्र सरकारच्या अखत्यारीतील हा प्रश्न असल्याचे सांगितले. त्यामुळे तुर्तास लोकल सेवा सर्वसामान्यांना सुरु होण्यास वेळ लागणार आहे. 
 
मुंबईकरांना लोकल प्रवासाची प्रतिक्षाच करावी लागणार आहे. दरम्यान, सोमवारपासून लेव्हल तीन नुसार अनलॉक करणे शक्य आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. लोकल सुरु करण्याचा निर्णय हा केंद्र आणि राज्य सरकारचा असल्याचे किशोरी पेडणेकर यावेळी म्हणाल्या.  आता आपण तिसऱ्या टप्प्यात आहोत. मुंबईला लेव्हल एकवर यायला काही आठवडे जातील. त्यामुळे मुंबईत अनलॉक होण्यास उशिर लागणार आहे. मात्र, तिसऱ्या टप्प्यातील नियमावली मुंबईत लागू होणार आहे, असे त्या म्हणाल्या..