शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (14:48 IST)

मुंबईतील लोकलसेवा पूर्णपणे बंद करणार?

कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्यात वीकेंड लॉकडाउन आणि इतर दिवशी कठोर निर्बंध लादण्यात आले असून मुंबई पालिका क्षेत्रातही या निर्बंधांची काटेकोरपणे अंलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, लोकलमधील गर्दी कमी होत नसल्याने राज्य सरकारची डोकेदुखी वाढली असून यावर येत्या काही दिवसांत महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत राज्याते मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
 
गेल्यावर्षी मार्च महिन्यात देशात लॉकडाउन लागू करण्यात आल्यानंतर मुंबईतील लोकलसेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. मुंबईकरांची लाइफलाइन असलेल्या लोकलसेवेसाठी तो अभूतपूर्व असा काळ ठरला होता.
 
दरम्यान, राज्य सरकारच्या विनंतीवरून नंतर अत्यावश्यक सेवेत काम करणार्यान कर्मचार्यंरसाठी लोकलची विशेष सेवा सुरू करण्यात आली. कोरोना नियंत्रणात येऊ लागल्यानंतर या सेवेचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात आला. सध्या वेळेचे बंधन घालून सर्वच प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. मात्र गेले काही दिवस कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने व रोजची आकडेवारी नवे उच्चांक गाठत असल्याने स्थिती गंभीर बनत चालली आहे.