शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (15:25 IST)

दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्याना क्वारंटाईन करणार - किशोरी पेडणेकर

मुंबई महापालिकाही कोरोनाच्या मुद्द्यावर सक्रिय झाली आहे. मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, जे दक्षिण आफ्रिकेतून येत आहेत त्यांना क्वारंटाईन केलं जाईल. त्याचप्रमाणे व्हायरस आढळल्यानंतर जीनोम सिक्वेन्सिंग केलं जाईल.  दरम्यान दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नव्या व्हेरिएंटबाबत मुंबई महापालिकेने आज सायंकाळी 5.30 वाजता अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. 
 
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या की, नाताळचा सण येत असून जगभरातून लोकं आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मुंबईत येतात. बीएमसी पूर्ण खबरदारी घेत आहे. हे नवीन प्रकार अनेक देशांमध्ये चिंतेचं कारण बनले आहे. त्यामुळे आम्ही तयार आहोत. त्या म्हणाल्या की, लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावे आणि फेस मास्क वापरावा.