मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 (22:12 IST)

परमबीर सिंग यांच्या विरोधात ठाणे न्यायालयाने काढलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात मुंबईसह ठाण्यात खंडणी वसुली प्रकरणात पाच ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. परमबीर सिंह यांनी न्यायलयात हजेरी लावत चौकशीला सहकार्य करणार असल्याचे कबुल केल्याना त्यांना कोर्टाकडून दिला मिळाला आहे. त्यांनी दिलेल्या हमीमुळेच परमबीर सिंग यांच्या विरोधात ठाणे न्यायालयाने काढलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आले आहे. एकुण १५ हजाराच्या जातमुचलक्यावर हे वॉरंट रद्द करण्यात आले आहे. परमबीर सिंग यांच्यावर ठाणे नगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.
 
वॉरंट रद्द करताना परमबीर सिंह यांना काही अटी शर्थींवरच हे वॉरंट रद्द करण्यात आले आहे. एकुण १५ हजारच्या जात मुचलक्यावर तसेच तपास यंत्रणेला सहकार्य करण्याचा हमीवर हे वॉरंट न्यायालयाने रद्द केले आहे. परमबीर सिंग न्यायालयातून पुन्हा ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्या संदर्भातील काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते पुन्हा ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.