शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (22:11 IST)

येत्या 22 ते 29 डिसेंबर काळात हिंवाळी अधिवेशन

राज्य विधीमंडळाचं यंदाचं हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. येत्या 22 ते 29 डिसेंबर या काळात हिंवाळी अधिवेशन पार पडणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत.
 
परंपरेप्रमाणे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूरला होत असतं, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतामुळे हे अधिवेशन मुंबईत होणार आहे. 
 
या आधी पावसाळी अधिवेशनात आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरला नागपूर इथं होईलं, असं घोषित करण्यात आलं होतं. पण अधिवेशनाला काही दिवसांचाच कालावधी असताना अधिवेशन डिसेंबरच्या अखेरीस होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसंच राज्यातून कोरोना अद्याप पूर्णपणे गेलेला नाही, हा सगळा विचार करता महाविकास आघाडी सरकारला हे अधिवेशन मुंबईत हवं आहे.