मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (15:35 IST)

बनावट नोटा छापण्याच्या कारखान्याचा पर्दफाश, एकाला अटक

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा गुप्तवार्ता विभागाने धडक कारवाई करत बनावट नोटा छापण्याच्या कारखान्याचा पर्दफाश केला आहे. या कारवाईत लाखो रुपयांच्या नोटा देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत. मुंबईतील पायधुनी परिसरात हा नोटांचा कारखाना होता. या प्रकरणी एका ४७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून इतर साथीदारांचा गुप्ता वार्ता विभागाकडून शोध सुरु आहे. 
मुंबईतील पायधुनी परिसरात मुंबई पोलिसांच्या गुप्त वार्ता विभागाने एका बनावट नोटा छापण्याच्या कारखान्यावर छापेमारी केली. या कारवाईत भारतीय नोटा छापण्याचा कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला. पोलिसांनी या कारखान्यातून १ लाख ६० हजाराच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. तर ४७ वर्षीय आरोपी शब्बीर हासम कुरेशीला अटक करण्यात आली आहे. चौकशी केल्यानंतर शब्बीरच्या घरातून पोलिसांनी एक संगणक प्रिंटर आणि बनावट नोटा बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य जप्त केले आहे. राहत्या घरीच आरोपी बनावट नोटा छापत होता.
 
आरोपी शब्बीर हासम हा मुंबईतील पायधुनी करिमी मंजील, नारायण ध्रुत स्ट्रीट येथे राहत होता. राहत्या घरीच शब्बीरने नोटा छापल्या असून मुंबईतील अनेक बाजार पेठांमध्ये या नोटा वितरित केल्या आहेत.