मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (20:36 IST)

एसटी संपात व्हायरल मेसेजमुळे गोंधळ उडाला

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाची मागणी प्रमुख आहे. सध्या मुंबईतील आझाद मैदानावर एसी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. भाजपनेही या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. या आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा पाठिंबा आहे. पण एका व्हायरल मेसेजमुळे पडळकर आणि खोत यांच्या भूमिकेवर संशय घेतला जात आहे. या मेसेज मध्ये हे दोन्ही नेते मॅनेज झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.या मुळे दोघांच्या भूमिकेवर शंका घेतली जात असू शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. या मेसेज मुळे गोंधळ निर्माण झाला. या मेसेजवर प्रतिक्रिया देत दोन्ही नेते एसटी कर्मचाऱ्यांना म्हणाले की 'तुमचा विश्वास नसेल तर आम्ही या आंदोलनातून बाहेर पडतो. आणि आपल्या घरी जातो.  असं दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात येत आहे . या नंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवून खांद्यावर उचलून घोषणा बाजी केली. या व्हायरल मेसेजमुळे होणारा गोंधळ आता शांत झाला आहे. 
सध्या परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे एसटी कर्मचाऱ्यांची बैठक सुरू आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह एसटीचे कर्मचारी या बैठकीला उपस्थित आहेत. आता एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप लवकरच मिटेल आणि काहीतरी मार्ग निघेल असे वाटत आहे.