मंगळवार, 25 मार्च 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वार्ता|

राष्ट्रपती कलाम परदेश दौरा आटोपून भारतासाठी रवाना

अथेन्स राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम फ्रांस व यूनानचा चार दिवसीय दौरा आटोपून भारतात परतण्यासाठी रवाना झाले आहेत. अधिकारिक सूत्रांनी यूरोपीय देशांशी द्विपक्षीय संबंध वृद्धींगत करण्याचे दृष्टीने राष्ट्रपतींच्या दौरा यशस्वी झाल्याचे सांगीतले.

अथेन्स हवाई अड्यावर यूनानचे विदेश उपमंत्री वाई वलिनकिस व यूनानमधील भारताचे राजदुत बी बालाकृष्णन यानी निरोप दिला

या विदेश दौर्‍याची सुरूवातीला डॉ. कलाम यांनी फ्रान्सच्या स्ट्रांसबर्ग येथील यूरोपच्या संसद भवनात भाषण केले.