सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 28 मे 2024 (12:27 IST)

मिजोरम मध्ये भीषण दुर्घटना, दगडांची खाण धसल्याने 10 लोकांचा मृत्यू

mizoram
मिजोरम मधील आईजोल जिल्ह्यामध्ये दगडांची खाण धसल्याने 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक बेपत्ता आहे. या परिसरात अवकाळी पाऊस सतत कोसळत होता, ज्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. 
 
पोलिसांनी सांगितले की, आईजोल शहराच्या दक्षिण भागामध्ये स्थित मेल्थम आणि हीलमेन च्या मध्ये सकाळी सहा वाजता ही घटना घडली. सतत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे बचाव अभियान प्रभावीत होत आहे. 
 
अधिकारींनी सांगितले की, पावसामुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन देखील झाले आहे. हुनथर मध्ये राष्ट्रीय राजमार्ग 6 वर भूस्खलन मुळे आईजोल देश इतर भागांपासून वेगळा झाला आहे. 
 
याशिवाय अनेक अंतर राज्य राजमार्ग देखील भूस्खलने प्रभावित झाले आहे. जोरदार पडणाऱ्या पाऊसामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहे. तसेच आवश्यक सेवा प्रदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोडून सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. 

Edited By- Dhanashri Naik