रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 28 मे 2024 (10:02 IST)

कानपूरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुलीचा मृत्यू

उत्तर प्रदेश मध्ये एक वाईट बातमी समोर आली आहे. उत्तरप्रदेश मधील कानपूर मध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तर तिचा लहान भाऊ रुग्णालयात दाखल आहे. या घटनेमुळे कुटूंबियांनी रस्ता अडवून धरला. पीडितांच्या कुटुंबांना भेटायला आलेल्या महापौर यांनी मांस-मछली च्या बेकायदेशीर दुकानांवर बुलडोझर चालवले. 
 
उत्तर प्रदेशमधील कानपूरमधील भटक्या कुत्र्यांनी एका सहा वर्षाच्या मुलीला चावा घेतला ज्यामध्ये  तिचा मृत्यू झाला आहे. तर तिचा एक वर्षाचा लहान भाऊ रुग्णालयात दाखल आहे. या मुलीच्या कुटुंबाला भेटायला आलेल्या महापौर प्रमिला पांडे यांना राग अनावर झाल्याने त्यांनी बेकायदेवीर मांस दुकानांवर बुलडोझर चालवले. 
 
महापौर यांनी 44 बेकायदेशीर मांस दुकानांवर कारवाई केली आहे. मुख्य चिकित्सा अधिकारींनी सांगितले की, दूषित मांस खात असलेले ह्या कुत्र्यांमध्ये हिंसक प्रवृत्ती जन्माला आली. 
 
या घटनेने संप्तत कुटुंबीयांनी मुलीच्या मृतदेहाला घेऊन चुकत रस्ता रोखून धरला. वेळेवर पोहचलेल्या पोलिसांनी कुटुंबियांना समजावले. या प्रकरणात एसीपी अमरनाथ यादव यांचे म्हणणे आहे की, कुटुंबीयांनी सांगितले की, कुत्र्यांच्या हल्ल्यात या मुलीचा मृत्यू झाला आहे. व पोस्टमोर्टमच्या रिपोर्ट आधारावर पुढील कारवाई करण्यात येईल. 

Edited By- Dhanashri Naik