शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 22 फेब्रुवारी 2017 (17:40 IST)

1000 ची नवी नोट आणण्याची कोणतीही योजना नाही- अर्थसचिव

नोटाबंदीनंतर चलनातून बाद करण्यात आलेली 1000 ची नवी नोट नव्या स्वरुपात व्यवहारात येणार असल्याच्या वृत्ताला केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी पुर्णविराम दिला आहे. 1000 ची नवी नोट आणण्याची कोणतीही योजना नसून 500 आणि कमी चलनाच्या नव्या नोटांची छपाई आणि पुरवठ्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत अशी माहिती केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी दिली आहे.शक्तिकांत दास यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. '1000 ची नवी नोट बाजारात आणण्याचा कोणताही विचार नाही. सध्या 500 आणि कमी चलनाच्या नोटछपाईवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. एटीएममध्ये रोख नसल्याच्या तक्रारी आल्या असून त्याकडे लक्ष देत आहोत', असं शक्तिकांत दास यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी एटीएममधून गरज असेल तितकेच पैसे काढण्याचं आवाहन लोकांना केलं आहे.