1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 29 जानेवारी 2022 (09:53 IST)

दिल्ली गँगरेप प्रकरणी 11 जणांना अटक

11 arrested in Delhi gangrape caseदिल्ली गँगरेप प्रकरणी 11 जणांना अटक Marathi National News In Webdunia Marathi
दिल्लीतल्या शाहदरा भागातल्या कस्तुरबा नगरमध्ये एका महिलेचं कथितरित्या अपहरण करून गँगरेप प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 11 जणांना अटक केली आहे.
या महिलेचं मुंडन करून तिच्या चेहऱ्याला काळ फासण्यात आलं आणि गळ्यात चपलांची माळ घालून फिरवण्यात आल्याचा आरोप आहे. ही पीडिता 20 वर्षांची असल्याचं सांगण्यात आलंय.
 
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये 9 महिलांचा समावेश असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलंय.